पूर्णानगर-संभाजीनगर येथील उद्घटनावरून राष्ट्रवादी-भाजपा ‘आमने-सामने’
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आज (दि.०६) जाहीर आंदोलन करणार आहे. मागील पाच वर्षात कधीही विकास कामांची पाहणी करण्यासाठी, जागेवर उद्घाटन न करणाऱ्या आणि शहराला वेळ न देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणार आहे.

ज्यांच्या विश्वासावर महापालिकेचे सत्ता सोडून दिली त्यांनी पालिका कशी विकून खाल्ली हे दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान पूर्णानगर-संभाजीनगर, चिंचवड येथे आज (दि.०६) दुपारी ३ वाजता हे आंदोलन होणार आहे.

पूर्णानगर येथील खाणीत जागतिक दर्जाचे उद्यान विकसित केले आहे. असे पालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच अद्याप काम पूर्ण झाले नसताना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाट घातला आरोप माजी महापौर मंगला कदम यांनी केला आहे. तर त्याला भाजप नगरसेवक एकनाथ पवार यांनी उद्यानाची पाहणी करण्यासाठी जाहीर निमंत्रण दिले आहे.
त्यानंतर मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पवित्रा घेत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे रविवारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये पॉलिटिकल राडा होणार आहे.
Tags: अजित गव्हाणेआंदोलनउद्घाटनपिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसपूर्णानगरभाजपा भ्रष्टाचारशहराध्यक्षसंभाजीनगर





















Join Our Whatsapp Group