पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नरेंद्र बनसोडे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या हस्ते पिंपरी येथील काँग्रेस कार्यालयात देण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांची विशेष उपस्थिती होती.

नरेंद्र बनसोडे हे काँग्रेस पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते विद्यार्थी चळवळीपासूनच काँग्रेस संघटनेत काम करत आहेत. २००२ साली एनएसयुआयचे वार्ड उपाध्यक्ष पदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात झाली. पुढे एनएसयुआयचे विभाग अध्यक्ष, शहर सरचिटणीस व पुढे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस झाले. २००९ साली युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव, २०११ साली जाहीर झालेल्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूका देशाभरात सुरू झाल्या, त्यात पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष, पुढे मावळ लोकसभा सरचिटणीस व २०१५ साली मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, २०१८ साली पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पदी निवडून आले.
२०१९ सालच्या चलो वार्ड अभियानात ते राज्यात सर्वात पहिले आले. एकूण १०,५०० युवा शक्ती कार्ड नोंदवून ते राज्यात अव्वल ठरल्याने त्यांचा सत्कार मुंबई वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात युवक काँग्रेसचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
मागील सलग सात वर्षांपासून युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अनुभव असलेले बनसोडे हे संघटनात्मक कामात पारंगत आहेत. ते उत्तम वक्ते, कुशल संघटक व मेहनती कार्यकर्ते मानले जातात. ते उच्च शिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम, जीडीसी ॲण्ड ए., एमएसडब्ल्यू, व सध्याचे एम ए (बौध्द साहित्य व पाली) हा अभ्यासक्रम शिकत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश कडून काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्वच शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी जाहीर केलेल्या नियुक्त्या रद्द केल्याने आता कार्याध्यक्ष हे पद नसून सर्वत्र वरिष्ठ उपाध्यक्ष नेमण्यात येत आहेत. यातूनच बनसोडे यांची नियुक्ती केली गेली आहे.
या प्रसंगी बोलताना बनसोडे म्हणाले, “काँग्रेस पक्षाची समतावादी विचारधारा लहानपणापासूनच मनाला भावली सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मुल्ये व नेतृत्व गुण वाढीस वाव देणारा व सामान्य माणसाच्या घरातून नेतृत्व निवडणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे व या पक्षाची आज एक नवी जबाबदारी मिळाली आहे व ते माझे भाग्य आहे. पुढील काळात अधिक जोमाने पक्ष संघटना वाढवत काँग्रेस चा विचार जनसामन्यांमध्ये अधिक खोलवर रूजविण्याचा प्रयत्न करणार आहे. उपेक्षितांचे प्रश्न सोडवित, असंघटीतांना संघटित करत, दुर्बल घटकांना सक्षम करत व गरजूंना समाजाच्या मुख्य प्रवाहात समावून घेत पक्ष संघटन अधिक बळकट करणार आहे” असे बनसोडे म्हणाले.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, महिला काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा काँग्रेस अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी विधानसभा काँग्रेस अध्यक्ष दिनकर भालेकर, के. हरीनारायणन, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, हिराचंद जाधव, डॉ. मनिषा गरूड, स्वाती शिंदे, निर्मला खैरे, अनिता भिसे, वैशाली शिंदे, विजय ओव्हाळ, ॲन्थोनी झेवियर, झुबेर खान, आकाश शिंदे, शेखर भिसे, पांडूरंग जगताप, दिपक भंडारी, किरण नढे, सचिन कदम, सतिश भोसले, किरण खाजेकर, अर्जुन लांडगे, बाबा बनसोडे, गौतम औव्हाळ, आदि पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group