पिंपरी (Pclive7.com):- महापालिकेतर्फे चिंचवड गावातील चापेकर चौक येथील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मोरया हॉस्पिटलकडून चापेकर चौकात येणाऱ्या वाहनांना मनाई केली आहे. गुरुवारपासून (दि.७) याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले.

महापालिकेतर्फे चापेकर चौकात सुशोभिकरण तसेच रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या कामाचा पुढील टप्पा म्हणजे मोरया हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करावी लागेल. यामुळे मोरया हॉस्पिटलकडून येणाऱ्या वाहनांना मनाई केली आहे.
मात्र मोरया हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे. मोरया हॉस्पिटलकडून चापेकर चौकात येणारी वाहने पॉवर हाऊस चौकातून भोईर आळी येथून चापेकर चौकात येणार आहेत. २० दिवसांकरिता हा बदल असणार आहे.






















Join Our Whatsapp Group