पिंपरी (प्रतिनिधी):- गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी ही नियुक्ती केली अाहे.
मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पार्टी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकडकर यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना विस्कळीत झाल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर सर्वेसर्वा अजित पवार यांनी पक्षसंघटनेवर लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार नुकतीच महिला अध्यक्षपदी नगरसेविका वैशाली काळभोर यांची निवड केली आहे. आता युवक अध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती केल्यामुळे पक्षात आलेली मरगळ दूर होण्यात नक्कीच मदत होणार आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेल्या या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीत नक्कीच उत्साह निर्माण होणार आहे.