पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांना केस दान ही चळवळ गेले दोन वर्ष सुरू करण्यात आली होती. ती थेरगाव सोशल फाउंडेशनचे कोर मेंबर राहुल सरोदे यांच्या माध्यमातून राहुल यांनी स्वतःचे केस हे कॅन्सर रुग्णांना दोन वेळा दान करून या चळवळीला सुरुवात केली. त्यांच्या या केस दान उपक्रमाला प्रोत्साहित होऊन थेरगाव सोशल फाउंडेशनचे सदस्य अभिनव पांचाली हे ही या चळवळीमध्ये आपले स्वतःचे केस दान करून सहभागी झाले आहेत.
थेरगाव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हे उचललेले पाऊल कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केमोथेरेपी मुळे केस गळतात व त्यांना पुन्हा केस उगवणे खुप अवघड असते. आजारपणामुळे तर ते खचलेले असतातच त्याचबरोबर आता डोक्यावर केस नसलेल्या, आजारी परिस्थितीत लोकांपुढे/समाजात कसे वावरायचे? लोक काय म्हणतील? यातून त्यांचा आत्मविश्वास हरवला जातो. या किचकट, वेदनादायी उपचारात ज्याने आधीच संपूर्ण लढ्यासह बरेच संघर्ष केले होते, अशांचा पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काहीतरी मदत ट्रस्ट या संस्थेला केस दान करण्याचा निर्णय मदत ट्रस्ट ही संस्था मुंबईस्थित असून खास कर्करोगावर उपचार प्रदान करत असलेल्या टाटा हाॅस्पिटलशी संलग्न राहुन आपण दान दिलेल्या केसांचा वापर टोप (विग) बनवण्यासाठी करते. आणि ते विग जे रुग्ण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते खरेदी किंवा विकत घेऊ शकत नाहीत अशा कर्करोगाशी लढत असलेल्या रुग्णांना मोफत देते.
मदत ट्रस्ट यांनी अभिनव पांचाली यांचे केस नम्रपणे स्वीकारुन मला प्रशंसापत्र/प्रमाणपत्र देखील पाठवले आहे. आणि हे सर्व करत असताना त्यांना त्यांचे कूटुंबीय, सहकारी मित्र परिवार यांचा खुप मोठा पाठिंबा मिळाला. मृत्यू नंतर आपण अवयव दान करू शकतो, पण जिवंतपणी आपण “रक्तदान व केसदान” करू शकतो, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केसदान ही संकल्पना समाजात फारशी रुजलेली नाही याच विचारातुन आम्ही जनजागृती करत आहोत. आपणही या चळवळीत सामील व्हा, आपल्याला किंवा आपल्या ओळखीमध्ये कोणाला केस दान करायचे असतील तर आम्हाला संपर्क साधावा असे आवाहन थेरगाव सोशल फाऊंडेशनचे राहुल सरवदे (९९२२२२१२७३) यांनी केले आहे.