चाकण (Pclive7.com):- चाकण एमआयडीसी आणि परिसरातून चोरीला गेलेल्या तब्बल २५ दुचाकींचा शोध घेण्यात चाकण पोलीसांच्या डी.बी. पथकाला यश मिळाले आहे. पोलीसांनी या कारवाईत तीन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून साडेबारा लाख रूपये किंमतीच्या २५ दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अशोक मधुकर सोनवणे (रा.राळेगण थेरपाळ ता.पारनेर जि.अहमदनगर, फारूक अन्सार पठाण रा.चाकण ता.खेड जि पुणे व योगेश प्रकाश वटांबे रा. बालाजीनगर चाकण ता खेड जि. पुणे) यांना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने दुचाकींची चोरी होत होती. चाकण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना या चोरींचा पर्दाफाश करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जन्हाड, विक्रम गायकवाड तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला. वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन परिसरातील सीसीटिव्ही फुटेज गोळा केले. तसेच गोपनिय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून आरोपींचा शोध सुरू ठेवला.

शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी पोलीसांचे पेट्रोलिंग सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व तपास पथकास बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी अशोक मधुकर सोनवणे, फारूक अन्सार पठाण व योगेश प्रकाश वटांबे हे दुचाकी चोरी करीता साबळेवाडी व मेदनकरवाडी, चाकण परिसरात येथे येणार आहेत. त्यातील आरोपी अशोक सोनवणे हा भोसे, चाकण येथील चोरीची दुचाकी घेवुन फिरत असताना पोलीसांनी सापळा लावुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानतंर आरोपीला पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने यापूर्वी चाकण पोलीस ठाणे व इतर ठिकाणाहून एकुण १९ हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेन्डर व स्प्लेन्डर प्लस मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीसांनी इतर दोन आरोपींना देखील अटक केली. त्यांनी देखील चाकण परिसरातून स्प्लेन्डर प्लस, टि व्ही एस अपाचे, मॅस्ट्रो अशा एकुण ६ दुचाकी चोरल्याचे कबुल केले.
पोलीसांनी आरोपींकडून १२ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या एकुण २५ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच इतर १२ वाहनांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेवुन तपास सुरू केला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ मंचक इप्पर, सहा.पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी तपास पथकाचे चांगल्या कामगिरी बाबत अभिनंदन केलेले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सहायक पोलीस फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार सुपेकर, गायकवाड, संदिप सोनवणे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, निखिल शेटे, सुदर्शन बर्डे, भैरोबा यादव, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जमदाडे, पोलस कॉन्स्टेबल नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर, ईश्वर भोसले, यांनी केलेली आहे.





















Join Our Whatsapp Group