पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथून अपहरण झालेल्या ७ वर्षीय ओम संदिप खरात याची सुखरूप सुटका केल्याबद्दल निगडी पोलिसांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विशेष सत्कार करण्यात आला.
निगडी पूर्णानगर येथून शनिवारी (दि.२३) रोजी दुपारी चारच्या सुमारास ओम संदिप खरात या ७ वर्षाच्या मुलाचे मोटारीतून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले होते. त्यानंतर निगडी पोलीसांनी तात्काळ आपली सुत्रे हालवून तपास कार्य सुरू केला. तब्बल ४०० पोलीसांची टिम या तपासाला लागली होती. अखेर ७२ तासांच्या अथक प्रयत्नातून निगडी पोलिसांकडून या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. ओमला त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. निगडी पोलीसांनी केलेल्या या विशेष कार्याबद्दल पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी निगडी पोलिस ठाणे निरीक्षक पळसुले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर अवताडे आणि टिमचा सत्कार केला. यावेळी ओम आणि त्याचे वडील संदिप खरात यांच्यासह के.के.कांबळे, सुनिल कानसकर, मिलींद सोनवणे, महेंद्र निशीगंध, निलेश पवार, गणेश वाघमारे, स्वप्निल लोंढे, मनसे पदाधिकारी, आदि कार्यकर्ते निगडी पोलिस ठाण्यात उपस्थित होते.