पिंपरी (Pclive7.com):- पिंपळेगुरव मधील अनंतनगर तरुण मित्र मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असून, यानिमित्त मंडळाने स्वराज्य महाल हा भव्य देखावा साकारला आहे. मंडळाची स्थापना 1972 साली झाली आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने बाल जत्रा, रक्तदान शिबिर, होम मिनिस्टर, निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन आधी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूकही डोळ्याचे पारणे फेडणारी असते
मंडळाने कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरांचे आयोजन, अनाथ आश्रमांना अन्नधान्य स्वरूपात मदत, वृद्धाश्रमांना मदतीचा हात, नागरिकांच्या सेवेसाठी वाचनालय, वारकऱ्यांची सेवा, आदी विविध कार्यक्रम घेतले आहेत. या व्यतिरिक्त मंडळ समाज प्रबोधन करणारे, तसेच विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक देखावे सादर करीत असते, जेणेकरून समाजप्रबोधन होईल.
याबरोबरच विविध समाजसुधारक व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम घेते. तसेच बालकांसाठी दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करते. मंडळाने आतापर्यंत सादर केलेल्या अनेक गणेशोत्सव देखाव्यांना महापालिका व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पारितोषिक मिळाले आहे.