पिंपरी (Pclive7.com):- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.०६) सकाळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बावनकुळे यांनी जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करत चर्चा केली.

त्यानंतर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज केवळ लक्ष्मण जगताप यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे, खूप चांगली चर्चा त्यांच्याशी झाली. मला विश्वास आहे की, लवकरच लक्ष्मणभाऊ ॲक्शन मोडमध्ये येतील असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी शंकर जगताप, विजय जगताप, माजी महापौर माई ढोरे, भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार, जेष्ठ नेते सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडेगिरी, शत्रुघ्न काटे, संतोष कलाटे, नवीन लायगुडे तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group