पिंपरी (Pclive7.com):- स्वर्गीय श्री फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त निगडी येथील कीर्ती विद्यालय येथे फिजिओथेरपी व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत शिबिराचा लाभ निगडी परिसरातील १५० नागरिकांनी घेतला. ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी विविध तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हाडांचे उपचार, हाडांच्या ठिसूळता तपासणी, स्त्री रोग उपचार, नेत्ररोग तपासणी, रक्त तपासणी व भौतिकोपचार आदी तपासण्या करण्यात आल्या. माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात निगडी ज्येष्ठ नागरिक संघाने सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती चांदबी सय्यद, कॉलेजच्या संचालिका डॉ. झोया पानसरे, प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दिगंबर इंगवले,, सुभाष जोशी, दलिचंद सिंघवी व इतर सदस्य उपस्थित होते. स्वागत प्राचार्य वर्षा कुलकर्णी, सूत्रसंचालन डॉ. श्वेता पाचपुते व डॉ. पल्लवी चिचोलीकर यांनी केले व आभार डॉ. श्रुती मुळावकर यांनी मानले.
तसेच फिजिओथेरपी विषयी जनजागृती व्हावी यासाठी स्वर्गीय श्री फकीरभाई पानसरे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी वूमन सेल (IAPWC) पुणे यांच्या सहयोगाने शनिवारी (दि.१०) चिंचवड येथील गोखले वृंदावन सोसायटी येथे फिजिओथेरपी जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गार्गी भालेकर, डॉ. नेहा देशपांडे, डॉ. लावण्या अय्यर, डॉ. भाग्यश्री बडवे, डॉ. नमिता व राजू शिंगोटे यांनी संयोजनात सहभाग घेतला.


















Join Our Whatsapp Group