पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी (दि.०३) सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये, तसेच विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.

गेल्या सोमवारी (दि.२६) सार्वजनिक सुटी असल्याने सभा झाली नव्हती. ती उद्या (सोमवारी) होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासक शेखर सिंह यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group