पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृतदेह बदलल्या गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी प्रचंड तोडफोड करतं गोंधळ घातला आहे. काही वेळा पूर्वीच ही घटना घडली असून संबंधित मयत व्यक्तीच्या नातेवाईकानी दिलेल्या माहिती नुसार पिंपरी शहरातील दापोडी परिसरात स्नेहलता गायकवाड नामक वृद्ध महिलेच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला होता.

त्यांच्या मृतदेहाच शव विच्छेदन करण्यासाठी मृतदेह YCM रुग्णालयात आणला होता. मात्र शव विच्छेदनां नंतर मृतदेह नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना धक्का बसला कारण तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याचे त्यांना कळालं. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी नातेवाईक हॉस्पिटलचे डीन डॉक्टर राजेश वाबळे यांच्याकडे गेले, मात्र त्यांनी उडवा उडविचे उत्तरं दिले आणि त्यानंतर तोडफोड केलीय.
सविस्तर बातमी लवकरच ..





















Join Our Whatsapp Group