पिंपरी (Pclive7.com):- सर्वत्र आनंद उत्साह दिवाळीची लगबग आणि ऐन दिवाळीत ठेकेदाराचा कामातील दिरंगाईपणामुळे कासारवाडीतील निष्पाप व्यंकटेशला या जगातून अखेरचा निरोप घ्यावा लागला. गेल्या अनेक महिन्यांपासून कासारवाडीमध्ये रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. त्यातूनच रस्ते नूतनीकरणाच्या नावाखाली संपूर्ण कासारवाडीमध्ये खोदाई सुरू करण्यात आले. परंतु अद्याप पूर्णत्वास एकही रस्ता आलेला नाही. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्या व्यंकटेशला आपला जीव गमवावा लागला.

या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करत मृत व्यंकटेशच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना करण्यात आली. त्याप्रसंगी चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी उपविधान सभा अधिकारी अविनाश जाधव, नितिन पाटिल युवासेना समन्वयक चिंचवड विधानसभा, राजेश पाटिल, विशाल भातंबरेकर सैपन मुजावर निजाम मुजावर उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group