पिंपरी (Pclive7.com):- दैनंदिन तपास, गुन्ह्यांची उकल, दररोजचा बंदोबस्त, गणेशोत्सव पासून दिवाळी पर्यंत कायदा सुव्यवस्था चांगली रहावी म्हणून अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांनी कर्त्यव्याबरोबर स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी लक्ष द्यावे असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांच्या वतीने व पिंपरी महापालिकेच्या प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी यांच्या साहायाने पोलिस बांधवांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी मिसाळ बोलत होते.
सदर शिबिराचे उद्घाटन निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकुर्डी महापालिका हॉस्पिटलचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल फरांदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक उत्तम ओमासे, पोलीस उप निरिक्षक नाथा केकान, पोलिस नाईक रुपेश गेंगजे, पोलीस कॉन्स्टेबल सोपान बोधवड, नानासाहेब पिसाळ, रज्जाक मणियार आदी उपस्थित होते.
यावेळी बहुतांशी पोलिसांनी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घेतली. रक्तामधील साखर, रक्तदाब, केलेस्टेरॉल, हिमोग्राम, थोयराईड आदींची तपासणी करण्यात आली. तसेच महिला पोलिसांसाठी त्यांच्या दैनंदिन शारीरिक समस्या बाबत चर्चासत्राद्वारे विशेष आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.
आकुर्डी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया शेटे, लता जगताप, शाहीन खान, निकिता आडे, शीतल कांबळे, प्रतिक्षा गुरव याचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश परदेशी, शाहरुख शेख, सुनील मोरे, जिब्राईल शेख, सुरज मोरे, वसंत सोनार, यशवंत भालेराव, संपतराव शिंदे, जावेद पठाण, गीता सुतार, ललिता माने, आदेश माने, दत्ता बोऱ्हाडे, सतीश सलीम, रमेश बनसोड, गिरीश जोशी आदींनी परिश्रम घेतले.