पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), निगडी येथील डीन – संशोधन डॉ. स्वाती शिंदे आणि प्रा. मधुरा काळभोर यांनी आयआयटी कानपुर येथे आयोजित केलेल्या ‘एसईआरबी – आयएनएचई काॅन्क्लेव ऑन आत्मनिर्भर टेन्कोलॉजी : इंजिनिअरिंग ए सिक्युर फ्युचर’ याच्या अंतर्गत इनोव्हेटीव्ह प्राॅडक्ट प्रोटोटाईप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
आयआयटी कानपुर येथे दि. 5 आणि 6 नोव्हेंबर 2022 रोजी दोन दिवसीय इनोव्हेटीव्ह प्रॉडक्ट प्रोटोटाइप ही स्पर्धा, एसईआरबी – आयएनएई यांच्यावतीने संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील विविध महाविद्यालयातून नाविन्यपूर्ण कल्पना, प्राॅडक्टस आणि स्टार्टअप यांना आमंत्रित करण्यात आले होते. एकुण 120 संघानी या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये इनोव्हेटिव्ह प्राॅडक्ट प्रोटोटाई स्पर्धेत 6 संघाना शेवटच्या फेरीमध्ये संशोधन सादरीकरणाची संधी मिळाली. स्पर्धेत पीसीसीओईच्या डॉ. स्वाती शिंदे आणि प्रा. मधुरा काळभोर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमात प्रा. मधुरा काळभोर यांनी आपले संशोधन सादर केले.
या संशोधनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) अनुदान दिले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे , विश्वस्त हर्षवर्धन पाटील तसेच नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रा. शिंदे आणि प्रा. काळभोर यांचे अभिनंदन केले.