शहरातील रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- सध्या शहरामध्ये डेंग्यूचा फैलाव होत आहे. त्यामुळे त्या रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक ‘प्लेटलेट’ आणि इतर रक्तघटकांना असलेली मागणी वाढली आहे. परंतु शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेला रक्ताचा साठा पुरेसा नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदात्यांनी व नागरिकांनी पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने ‘रक्तदान’ करावे, असे आवाहन माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी केले आहे.

बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी (दि.२३ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहाटणी लिंक रोड येथील छत्रपती चौक या ठिकाणी त्यांच्या नवीन जनसंपर्क कार्यलयाचेही उदघाटन भाजपचे चिंचवड विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, पिंपळे सौदागर परिसरातील युवक आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, मागील काही दिवसांपासून शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच डेंग्यूसारख्या आजारानेही डोके वर काढल्याने रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील एक जबाबदार नागरिक या नात्याने मी वाढदिवसाचा कोणताही डामडौल न करता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होऊन तरुणांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे.
Tags: Babasaheb Tribhuwan
























Join Our Whatsapp Group