पिंपरी (Pclive7.com):- जुन्या भांडणाच्या कारणावरुन तसेच व्यावसायिक वादातून कट रचुन गावठी कट्ट्यांने फायरिंग करत व धारदार शस्त्राने वार करत विशाल गायकवाड या तरुणावर हल्ला करुन निघृण हत्या करण्यात आली होती. पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत परशुराम चौक, रामनगर, चिंचवड, येथे (दि.०२) रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. त्यानंतर पोलीसांनी अवघ्या १२ तासांत हत्या करणार्या टोळीच्या मुसक्या आवळत जेरबंद केले आहे.

पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील रामनगरच्या परशुराम चौकात अर्जुन गायकवाड यांचे वॉशिंग सेंटर आहे. शुक्रवारी सायंकाळी अर्जुन हे वॉशिंग सेंटर समोर रस्त्याच्या पलीकडील बाजूला चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी वॉशिंग सेंटरवर आले. आरोपींनी अर्जुन यांचा भाऊ विशाल गायकवाड याच्यावर कोयत्याने वार केले. वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगाराने धावत जाऊन याबाबत अर्जुन यांना सांगितले. त्याचवेळी एका आरोपीने पिस्तुलातून दोन ते तीन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबार झाल्याने परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. अर्जुन यांनी वॉशिंग सेंटरमध्ये धाव घेतली. त्यावेळी विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जखमी विशालला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर पोलीसांनी तपासीाची चक्रे फिरवली. २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तांत्रिक विश्लेषनाव्दारे ०७ पुरूष व ०१ महिला आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात ०२ अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरीत आरोपींना ताब्यात घेवून तांत्रिक विश्लेषनाव्दारे सखोल तपास चालू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरिक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ हे करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group