मराठवाडा जनविकास संघ, कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सद्गुरू नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपूर यांच्या अधिपत्याखाली निघालेल्या अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांना स्वेटर, साड्या, कापडी पिशव्या व फळांचे वाटप करण्यात आले.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/11/500x500-PMC-News-Banner-Marathi-01-1-300x300.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, अरुण पवार यांच्या हस्ते पुरुष वारकऱ्यांना स्वेटर, महिला वारकऱ्यांना साडी वाटप व पर्यावरणापूरक कापडी पिशव्या व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी दत्त सेवेकरी चंद्रकांत रासकर, गोपाळ कांबळे, अनंत लिंबोटे, महादेव खंडागळे, बालाजी होणकर, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते गोपी पवार, संदिप राठोड, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221206-WA0007-300x169.jpg)
दिंडीतील वारकऱ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने स्वेटर वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरणाला घातक प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करीत पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा जनविकास संघ, कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान पिंपळे गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने करण्यात आले होते.