पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपळे सौदागर येथील युवानेते दिपक नागरगोजे यांनी भाजपात ‘घरवापसी’ केली आहे. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहिर प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीत डावलल्यामुळे नाराज होत त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती. परंतू त्यावेळी पराभव झाल्यानंतर गेल्या काही महिन्यापासून ते भाजपच्या संपर्कात होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप विरोधात असताना अनेक आंदोलनात नागरगोजे यांचा सहभाग होता. जुने निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. मात्र महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्याच रागातून त्यांनी बाहेरचा रस्ता धरला होता. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते गेल्या काही दिवसांपासून भाजपात येण्याच्या तयारीत होते.
चिंचवड येथे खासदार अमर साबळे यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला नागरगोजे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.