मुंबई (Pclive7.com):- १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची उद्या (२८ नोव्हेंबर) कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. आज ही मुदत संपत असल्याने उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने जामीनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आहे.
Tags: anil deshmukh




















Join Our Whatsapp Group