पिंपरी (Pclive7.com):- विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवीर नव्हते, या त्याच्या वक्तव्यामुळे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान झाला आणि त्यामुळे तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे धर्मविरोधी अजित पवार यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडलातील कार्यकर्त्यानी आज संध्याकाळी पाच वाजता शाहूनगर मधील शिव शंभो मंदिरासमोर जाहिर निषेध केला.
यावेळी नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, शर्मिलाताई बाबर, कमलताई घोलप, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, सरचिटणीस नंदू भोगले, सूर्यकांत मोहिते, सुप्रियाताई चांदगुडे, महिला मोर्चा अध्यक्षा दिपाली कारंजकर, माजी नगरसेविका जयश्री वाघमारे, नंदाताई करे, सुनिल वाट, आणि मंडलातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.