पिंपरी (Pclive7.com):- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालय आज (दि.०३) बंद राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.

महापालकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, मा. श्री. जगताप लक्ष्मण पांडुरंग, विद्यमान आमदार, चिंचवड विधानसभा तसेच माजी महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे दि.०३/०१/२०२३ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये दि. ०३/०१/२०२३ रोजी बंद राहतील.
दु.२ ते ६ या वेळी पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी असेल.
संध्या ७ वाजता अंत्यविधी पिंपळे गुरव येथे होईल.
संध्या ७ वाजता अंत्यविधी पिंपळे गुरव येथे होईल.






















Join Our Whatsapp Group