पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची प्राणज्योत आज मंगळवार सकाळी मालवली, ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालाच्या शेजारील गावठाणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.