पिंपरी (Pclive7.com):- स्मार्ट सिटी योजनेतील सर्व कामे जूनअखेरपर्यंत पूर्ण करावीत, असे केंद्र सरकारने महापालिकांना कळविले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात शहरातील विकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान स्मार्ट सिटीसमोर असणार आहे.

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात शहराचा सहभागी होऊनही राज्यस्तरीय गुणांकनात पिंपरी-चिंचवड शहर अग्रभागी राहिले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी योजनेत उशिरा समाविष्ट होऊनही त्यांनी कामांचे नियोजन केले. त्यामुळे कामांचा वेग अधिक आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, निधीची रक्कम याचा आधार घेऊन ही रैंकिंग देण्यात आली.
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. प्रकल्पांच्या अंमल बजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. आयुक्त हर्डीकर यांची बदली झाली. त्यानंतर आलेले राजेश पाटील, आत्ताचे आयुक्त शेखर सिंह यांच्या काळात वेग मंदावला आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटीच्या कामांना मुदत दिली आहे.
प्रशासक शेखर सिंह म्हणाले, ऑप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्पांतर्गत ६०० किलोमीटर केबल टाकली आहे. आतापर्यंत २०० कोटी रुपये खर्च आला आहे. त्यातून प्रतिवर्षी ३२ कोटीप्रमाणे दहा वर्षात सव्वातीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल.






















Join Our Whatsapp Group