पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज दि.७ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे २६ उमेदवारांनी ३१ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
दरम्यान, आज अखेर पर्यंत १२८ व्यक्तींनी २३१ नामनिर्देशन पत्रे नेली होती. दि.३१ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली होती. आज अखेर पर्यंत एकूण ४० उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
दि.३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी अखेर नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार खालीलप्रमाणे..
१. अॅड. अनिल बाबू सोनावणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (AB फॉर्म प्राप्त नाही)
२. मिलिंद कांबळे – अपक्ष
३. अजय हनुमंत लोंढे – अपक्ष
४. रफिक रशिद कुरेशी – अपक्ष
५. अश्विनी लक्ष्मण जगताप – भारतीय जनता पार्टी (मुख्य उमेदवार)
६. शंकर पांडुरंग जगताप – भारतीय जनता पार्टी (पर्यायी उमेदवार)
७. मोहन भागवत म्हस्के – बहुजन भिम सेना (AB फॉर्म विहित नमुन्यात नाही)
८. रवींद्र विनायक पारधे – अपक्ष
९. बालाजी लक्ष्मण जगताप – अपक्ष
१०. गोपाळ यशवंत तंतरपाळे – इंडियन नॅशनल काँग्रेस (AB फॉर्म प्राप्त नाही)
११. अमोल (देविका) अशोक सूर्यवंशी – अपक्ष
१२. सिद्धीक इस्माईल शेख – अपक्ष
१३. किशोर आत्माराम काशीकर – अपक्ष
१४. डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले – अपक्ष
१५. सोयलशहा युनुसशहा शेख – अपक्ष
१६. हरिश भिकोबा मोरे – अपक्ष
१७. जावेद रशिद शेख – अपक्ष
१८. राजेंद्र मारुती काटे – अपक्ष
१९. श्रीधर नारायण साळवे – अपक्ष
२०. राजू बबन काळे – अपक्ष
२१. विठ्ठल कृष्णाजी काटे – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
२२. सतिश श्रावण कांबिये – बहुजन मुक्ती पार्टी
२३. राहुल तानाजी कलाटे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (AB फॉर्म प्राप्त नाही)
२४. चेतन मछिंद्र ढोरे – अपक्ष
२५. दादाराव किसान कांबळे – अपक्ष
२६. गणेश सुरेश जोशी – अपक्ष
२७. मनीषा मनोहर कारंडे – अपक्ष
२८. चंद्रकांत रंभाजी मोटे – अपक्ष
२९. सुधीर लक्ष्मण जगताप – अपक्ष
३०. तुषार दिगंबर लोंढे – बहुजन भारत पार्टी
३१. प्रविण अशोक कदम – संभाजी ब्रिगेड पार्टी
३२. सतिश नाना सोनावणे – अपक्ष
३३. मनोहर नामदेव पाटील – आम आदमी पार्टी
३४. प्रफुल्ला शैलेंद्र मोतिलिंग – महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी
३५. मनोज मधुकर खंडागळे – आजाद समाज पार्टी (कांशीराम)
३६. उमेश महादेव म्हेत्रे – अपक्ष
३७. भाऊ रामचंद्र अडागळे – अपक्ष
३८. सुभाष गोपाळराव बोधे – अपक्ष
३९. प्रकाश रामचंद्र बालवडकर – अपक्ष
४०. संजय भिकाजी मागाडे – अपक्ष