पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील भाजपाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (दि.१५) भाजपाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे कामठे यांनी त्यांचा राजीनामा पाठवला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुषार कामठे यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

मी माझ्या भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्याकडे दिला आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती केली आहे. येत्या एक-दोन दिवसात पुढील भूमिका स्पष्ट करेल.– तुषार कामठे






















Join Our Whatsapp Group