चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये महाविकास आघाडी नियोजन आणि प्रचारामध्ये आघाडीवर आहे. आघाडीचे घटक पक्ष आणि सर्व कार्यकर्ते एकदिलाने, एकजुटीने काम करत असून नाना काटे यांचा विजय परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

काळेवाडी प्रभागातील सर्व केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि बूथ कमिटी सदस्य यांची आढावा बैठक विष्णुराज मंगल कार्यालय येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, प्रभागाचे निरीक्षक शाम लांडे, निरीक्षक राहुल भोसले, निरीक्षक इखलास सय्यद, प्रसाद कोलते, सविता धुमाळ, प्रभागातील सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून, विजय आपलाच आहे असे समजून गाफील राहून चालणार नाही. काळेवाडी भागात सर्व घटक पक्षाची एकजूट पाहता संपूर्ण चिंचवड विधानसभा मध्ये काळेवाडी भागात आपल्याला भरपूर आघाडी मिळेल असाही विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला. आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षीय सदस्य यांनी परिश्रम घेतले.
Tags: ajit gavhaneChinchwad ElectionIkhlas SayyadMaval VidhansabhaMLA Sunil shelkheNana katencpsham lande






















Join Our Whatsapp Group