चिंचवड (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त पुनावळे येथील पिंपरी चिंचवड महापालिका मुलांच्या शाळेत महिला दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी युवासेनेच्या वतीने महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना चिंचवड विधानसभा युवा उपअधिकारी सागर एकनाथ शिंदे यांनी केले होते.

यावेळी महिलांसाठी पाककला, संगीत खुर्ची, लिंबू चमचा आदी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. सर्व स्पर्धकांना बक्षीसाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान सागर शिंदे, युवासेना-चिंचवड विधानसभा युवा उपअधिकारी, नितीन दर्शले -शिवसेना विभाग प्रमुख, अमित दर्शले-शिवसेना विभाग संघटक, अक्षय पांढरे युवासेना प्रभाग युवा अधिकारी यांनी शिवसेना – युवासेनेच्या वतीने महिला शिक्षिकांचा सन्मान केला.
























Join Our Whatsapp Group