पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीत बुधवारी (दि.१२) राष्ट्रवादीचे नाल्यात बसून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधात राष्ट्रवादीचे इखलास सय्यद यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
आकुर्डी भागातून दोन मोठे नाले वाहतात. गेल्या अनेक महिन्यापासून नाले सफाई वरचे वर वेळेवर होत नसून नाल्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी नाले मोठ्या प्रमाणात तुंबले असून मच्छर फार वाढले आहे. आरोग्य विभागास वारंवार सूचना देऊन देखील आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन नाल्यातून वाहत असून नागरिक कमालीचे त्रस्त झाले असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवार दिनांक 12 एप्रिल रोजी आकुर्डी येथील सुर्वे गिरणीजवळून वाहणाऱ्या नाल्यात बसून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची महिती पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी दिली.