पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडीत कमी दाबाने, दूषित, गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. या विरोधात स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून चिखली, कुदळवाडी परिसरात दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या भागात जुलाब, उलट्या, पोटदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने या प्रश्नी तातडीने लक्ष देऊन स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग रामनाथ टकले यांना व ‘फ प्रभाग’ पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे कि, आधीच दिवसाआड पाणीपुरवठाने हैराण झालेल्या नागरिकांना आता दूषित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. सध्या एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तोही दूषित, गढूळ व दुर्गंधी युक्त होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
कुदळवाडी परिसरातील दूषित पाणीपुरवठा त्वरीत थांबवावा तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यादव यांनी केली आहे. यावेळी दिनेश यादव, योगेश यादव, दिपक घन व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, येत्या पंधरा दिवसात या भागातील दूषित पाणी पुरवठा बंद न झाल्यास महेशदादा लांडगे युवा मंचाच्या वतीने जनआंदोलन केले जाईल, असा इशाराही यादव यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group