पिंपरी (Pclive7.com):- देशाचा औद्योगिक क्षेत्रा बरोबरच सर्वांगीण विकास होण्यासाठी दळणवळणासह पायाभूत सेवा सुविधा उभारणे आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर पर्यावरण रक्षण हे देखील आवश्यक आहे. यासाठी देशभरात जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी प्राथमिक शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण रक्षण या विषयाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने सोमवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या हरित क्षेत्र आरक्षित जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे आसाम राज्याचे प्रभारी पृथ्वीराज साठे, पर्यावरण विभाग प्रदेश सरचिटणीस अमर नाणेकर, अशोक काळभोर, अक्षय शहरकर, ऋषिराज येवले, लायन्स क्लब पुणे आकुर्डी चे ओमप्रकाश पेठे, देहुरोड रेल्वे स्टेशन व्यवस्थापक रतन रजत, वरिष्ठ अभियंता
अजयकुमार भारती, सुभेदार शिवाजी क्षीरसागर, दिलीप दातीर, गुरुनाथ जाधव, ग्राहक संरक्षण सेल जिल्हाध्यक्ष वकीलप्रसाद गुप्ता, हरीश शेट्टी, मयूर जैस्वाल, मकर यादव, गौरव चौधरी, वसंतकुमार गुजर, बालाजी सुरवसे,हाजिमलंग मारीमुत्तु, व्यंकटेश वीरन, गफ्फूर भाई शेख, अतुल देशमुख, किरण येळंबकर, मनोज रकटे, दशरथ खांकरे, रणजित पाटील अजय हुरदळे, शैलेश हुरदळे, वैभव पांचाळ, प्रकाश पवार, सचिन गायकवाड, सचिन कांबळे, अनिकेत इंगोले, सौरभ लहाडे, सुनील ओटले,
इंद्रिजीत गोरे, सिद्धांत रिकीबे, मयुर रिकीबे, मनोज ढकोलिया, अनिल कदम, ऋषीराज लांडगे, मंगेश मोरे, ऋषिराज लांडगे, संग्राम रोकडे, देवानंद ढगे, अनिल कदम, महालिंग स्वामी, गणेश बिरादार, संभाजी पिंजण, आकाश रामनारायन, नागेश कसबे आदी उपस्थित होते. यावेळी शंभर देशी झाडांची लागवड करण्यात आली.