पिंपरी (Pclive7.com) : महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशन व जिल्हा बुलढाणा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली १३ वी वरिष्ठ राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा दि. ०४ ते ०६ जून २०२६ या कालावधीत चिखली (जि. बुलढाणा) येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर ही यशस्वी कामगिरी नोंदविली.

या संघांना प्रशिक्षक मुकेश पवार, रामेश्वर हराळे, संकेत साळुंखे आणि भावना पायमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सत्यवान वाघमोडे, एच. ए. स्कूलच्या मुख्याध्यापिका दर्शना कोरके मॅडम, उपमुख्याध्यापक माने सर, कार्याध्यक्ष मुकेश पवार, सचिव रामेश्वर हराळे, सहसचिव चंद्रशेखर कुदळे तसेच पिंपरी-चिंचवड डॉजबॉल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय स्पर्धेतील या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला असून खेळाडूंनी भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




















Join Our Whatsapp Group