पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी, निगडी परिसरातील सोन्या काळभोर टोळीतील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ पिस्टल व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. दरोडा विरोधी पथकाकडून कारवाई ही कारवाई करण्यात आली आहे. बाळासाहेब अंगदराव सातपुते (वय २६, रा. अनुबाई काळभोर चाळ, आकुर्डी. पुणे) असं आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी व निगडी भागातील कुख्यात गुन्हेगार सोन्या काळभोर याच्या टोळीतील सराईत गुन्हेगार बाळासाहेब सातपुते हा सध्या आकुर्डी व निगडी भागामध्ये सदर टोळीच्या वर्चस्व वाढविण्याचे काम करीत होता. स्थानिक नागरीकांना दमदाटी तो सध्या करीत होता. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरीक हे पोलीसांत तक्रार देण्यास देखील पुढे येत नव्हते. सध्या तो स्वतः जवळ पिस्टल बाळगुन स्थानिक व्यापाऱ्यांना दमदाटीचे करण्याचे व सोन्या काळभोर या टोळीचे वर्चस्व वाढविण्याचे काम करीत होता.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे त्याच्या मागावर होते. त्यादरम्यान पोलीस शिपाई गणेश सांवत, सुमित देवकर व विनोद वीर यांना सराईत गुन्हेगार बाळासाहेब सातपुते हा कमरेस पिस्टल लावुन भक्ती-शक्ती चौकाकडून कृष्णा व्हेज हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याने जाणार आहे अशी खबरब मिळली. त्यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी बातमीची खातरजमा करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड कडुन ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणाऱ्या वळण येथे सापळा लावला. आरोपी त्या परिसरात आल्यावर त्याला पोलीस त्याच्या मागावर असल्याची चाहुल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरोडा विरोधी पथकाच्या स्टाफने त्याचा पाठलाग करून शिताफिने ताब्यात घेतले. बाळासाहेब अंगदराव सातपुते या सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे एक सिल्वर रंगाचे लोंखडी गावठी पिस्टल, व एक जिवंत पितळी काडतुस जप्त करण्यात आले. या आरोपीविरुध्द निगडी पोलीस ठाण्यात कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा कोपनर, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस हवालदार उमेश पुलगम, पोलीस नाईक आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश हिंगे, पोलीस शिपाई विनोद वीर, गणेश सावंत, सुमित देवकर यांनी केली आहे.