पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या उर्दू मध्यामिक शाळांमधून उत्कृष्ठ कामगिरी केलेले दहावीचे विद्यार्थी आणि शहरातील इतर शाळांमधून दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह पिंपरी येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमासाठी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, अकील मुजावर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतिशय अव्हानास्पद आहे. सिद्धार्थ पुस्तक पेढीच्या वतीने पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून मोफत पुस्तके वाटण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असल्याबद्दलची माहिती त्यांनी दिली. आज जे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

संस्थेच्या खडतर प्रवासाबद्दलची माहिती गुलाम शेख यांनी सांगितली. सुरुवातीच्या कार्यकाळात महापालिकेच्या उर्दू मध्यामिक शाळामध्ये संस्थेच्या वतीने शिक्षक पुरविने, त्यांचे वेतन लोकवर्गणीतून जमा करून देणे, शिक्षक भरती आणि त्यांना किमान वेतन प्रमाणे पगार मिळावा यासाठी आंदोलन केले. परंतु पालिका प्रशासनाच्या उर्दू शाळाप्रती आलेली उदासीनता यामुळे शेवटी हा लढा मुंबई उच्च न्यायालयाकडे PIL दाखल करून दाद मागणे. हा सर्व प्रवास त्यांनी यावेळी सर्व उपस्थीत यांच्या समोर मांडला.
संस्थेचे अध्यक्ष अकील मुजावर यांनी यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांना 10 वी पास झालेल्या उर्दू मध्यामिक विद्यार्थ्यांसाठी 11वी व 12 वी चे कॉलेज सुरू करण्याकामी महापालिकेच्या वतीने वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात असे निवेदन केले.
शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी आणि पालक यांना क्रिएटिव्ह अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. नौशाद शेख यांनी करिअर बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सद्गुरु कदम, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, गुलजार शेख, एम व्ही कबीर, नजीर तरासगार, अझहर शेख, मौलाना इस्लामुद्दिन, मौलाना गफ्फार, गफूर कुरेशी, वाहिद कुरेशी, इम्रान बिजापूर, सलीम शेख, रशीद पिरजादे, केरळ जमात चे करीम भाई, अय्याज शेख, लतिफ सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शफीउल्ला काझी आणि रुहिनाज़ शेख यांनी केले.
आभार धम्मराज साळवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हाजी रौफ कुरेशी, नादीर बेग, मोहतेसिन सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, फैयाज शेख, नियाज़ देसाई, खालिद मुजावर, तसेच उर्दू शाळांचे शिक्षक अशपाक सर, परवीन नदाफ मॅडम, ताहेरा मॅडम, राबिया सिद्दीकी मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले.
Tags: Pcmc news