पुणे (Pclive7.com):- स्वराज्य पक्षाच्या वतीने विश्रांतवाडीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांची सेवा करण्यात आली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे १४ वे वंशज युवराज शहाजीराजे उपस्थीत होते. वारकऱ्यांची सेवा परमोच्च समाधान देणारी होती अशी भावना स्वराज पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व वारकरी भाविक भक्तांची स्वराज्यच्या वतीने सेवा करून स्वागत आले. विश्रांतवाडी चौकात पावसाळी छत्री वाटपासह, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व आरोग्य सेवा, फराळ, बिस्कीट पुडे, पाणी वाटप करुन वारकरी भक्तांची सेवा करण्यात आली.
यावेळी स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, गणेश सोनवणे, विनोद परांडे, सोमनाथ ढोले, सौरभ दौंडकर, गौतम जाधव, प्रणय शेंडे, दादाराव बोबडे, माऊली बोबडे, संकेत सोनवणी,हेमंत दाभाडे, गणेश गवळी, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, शैलेश तारडे, अजय बांडे यांच्यासह शिवराज प्रतिष्ठाण, शिवराज मित्र मंडळ, महाराष्ट्र पर्यटन संस्था, धम्मयान संघ यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group