केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने झालेली विकास कामे सर्व नागरिकांना कळावी. तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने पिंपरी विधानसभा संघटन भाजपच्या कामांचा शुभारंभ कासारवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आला. या नंतर परिसरातील बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या भेटीचे घरोघरी भेटीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक माऊली थोरात, कुणाल लांडगे, प्रकाश जवळकर, सुनील लांडगे, गजानन मोरे, सुरेश
गदिया, देवदत्त लांडे, संतोष टोणगे, गणेश जवळकर, हर्षल भोसले, गणेश संभेराव, सुहास जाधव, बापूसाहेब भोसले, बाळासाहेब लांडे, युवराज लांडे इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.