पिंपरी (Pclive7.com):- मोरेवस्ती येथील गुरुकुल सोसायटीच्या रस्त्याचे काम भाजपच्या काही नेते मंडळींनी मोठा गाजावाजा करत सुरू केले, मात्र पूर्ण करू शकले नाही. अर्धवट अवस्थेमध्ये पडलेल्या ह्या कामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते यश साने यांनी केला आहे.

याबाबत बोलताना यश साने म्हणाले की, येथील अर्धवट कामामुळे ड्रेनेज लाईन तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे. पाणीपुरवठा करणारी लाईन बऱ्याच ठिकाणी फुटल्याने होणारा अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वाया जाणारे पाणी, पाणी साठून होणारा चिखल यामुळे पसरणारी दुर्गंधी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

अखेर या सर्व समस्या सोडविण्यासाठी यश साने यांनी पुढाकार घेतला असून तुंबलेल्या ड्रेनेज लाईन व पाण्याची तुटलेली लाईन यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना लवकरात लवकर काम चालु करण्याच्या सूचना केल्या आहेत.





















Join Our Whatsapp Group