पिंपरी (Pclive7.com):- वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता २९ जून रोजीची वेळ आरक्षित केलेल्या सर्व वाहन मालकांना पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ४ जुलै ही नवीन तारीख आरक्षित करण्यात आलेली आहे.
२९ जून रोजी बकरी ईदची शासकीय सुट्टी जाहीर झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता वाहन मालकांना पूर्वनियोजित वेळ ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करुन दिलेली असते.
संबंधित वाहन मालकांनी आता त्यांच्या वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता मंगळवार दिनांक ४ जुलै रोजी वाहन चाचणी पथावर आणून त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.