पिंपरी (Pclive7.com):- भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी विभागचे उपाध्यक्ष अनिकेत शेलार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोरवाडी येथे साजरा करण्यात आला.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230713-WA0023-300x150.jpg)
शनिवार दि.१५ रोजी पै.अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. मोरवाडीतील जेष्ठ नागरिक महिला मंडळ व सर्व मित्र परिवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच या रक्तदान शिबिरात ५३ जणांनी रक्तदान केले.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230718-WA0005-300x225.jpg)
या कार्यक्रमाला माजी महापौर राहुलदादा जाधव, प्रदेश मंत्री (सचिव) अमित गोरखे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, वैशाली खाडे, शिवराज लांडगे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, प्रशांत कापसे, दिगंबर गुजर, सुहास आढाव, अमन तिवारी, व उद्योजक बाळासाहेब वाघिरे उपस्थित होते.