पुणे (Pclive7.com):- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांचे एअर फोर्स स्टेशन पुणे विमानतळ येथे स्वागत केले.

यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराजे देसाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देखमुख, माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रविवारी (दि.६) पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात ते एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.






















Join Our Whatsapp Group