पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथील धर्मवीर संभाजी अर्बन को. ऑप. बँक या बँकेची २०२३-२८ ही पंचवार्षिक निवडणूक नुकतीच कासारवाडी येथे पार पडली. या निवडणुकीनंतर नवनियुक्त संचालक मंडळाची नुकतीच सभा झाली. यावेळी बँकेच्या तज्ञ संचालकपदी सी. ए. बबन सोपान डांगले व प्रकाश बबनराव सोमवंशी यांची एक मताने निवड करण्यात आली.

सी. ए. बबन सोपान डांगले हे मागील १५ वर्षापासून सनदी लेखापाल म्हणून काम करत आहेत. पिंपरी चिंचवड व पुणे येथील अनेक नामवंत कंपन्या, आर्थिक संस्था यांचे ते लेखा परिक्षक व आयकर सल्लागार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सुचने नुसार त्यांची बँकेच्या तज्ञ संचालक पदी नियुक्ती केल्याने बँकेस निश्चितच त्यांच्या व्यावसायीक अनुभवाचा फायदा होणार आहे.

तसेच प्रकाश सोमवंशी यांचीही तज्ञ संचालक पदी नियुक्ती करणेत आली आहे. सोमवंशी हे अनेक संस्थामध्ये मागील १५ ते २० वर्षापासून पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा सुध्दा बँकेस लाभ होईल असे बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव शितोळे यांनी सांगितले.
Tags: तज्ञ संचालकधर्मवीर संभाजी बँकधर्मवीर संभाजी बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव शितोळे व उपाध्यक्षपदी ॲड. आनंद थोरात यांची निवडप्रकाश सोमवंशीबबन डांगले





















Join Our Whatsapp Group