पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरु करण्याबाबत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे “आक्रमक” झाले आहेत. सतत पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शत्रुघ्न काटे यांनी लेखी निवेदनामार्फत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर परिसरामध्ये नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबतचे लेखी निवेदन दि.२३/०२/२०२२ रोजी डाक कार्यालय पुणे याठिकाणी सादर केले होते. त्या पत्रामार्फत पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफिस संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी किती त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतचे सविस्तर वर्णन त्या पत्रामार्फत संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. परिसरातील नागरिकांना मुख्यतः जेष्ठ नागरिक आणि महिला यांना औंध पोस्ट ऑफिसला येण्या-जाण्यासाठी ५ किमी लांब फिरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.

परंतु पूर्वी केलेल्या पत्र व्यवहाराला जवळजवळ दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा शत्रुघ्न काटे यांच्या मागणी बाबत कोणतेही प्रतिसाद संबंधित विभागाने कळविले नाही. आज आपल्या या पत्राद्वारे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी डाकघर मुख्यालयाला विचारना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पिंपळे सौदागर परिसरामध्ये नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीला तुमचा विभाग काय कार्यवाही करीत आहे? किंवा या दीड वर्षात पिंपळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबत डाकघर मुख्यालय पुणे यांच्यामार्फत कोणती प्रक्रिया पार पडली? याची कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती शत्रुघ्न काटे यांच्या कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. त्याचे कारण स्पष्ट करावे तसेच आपण याबाबत काय पाऊले उचलली आहेत किंवा उचलणार आहात याबाबत लेखी माहिती माझ्या कार्यालयास कळवावी” अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे.
तरी आज दि. २२/०८/२०२३ रोजी पुन्हा आपल्या लेखी निवेदनामार्फत पिंपळे सौदागर परिसरामध्ये नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून लवकरात लवकर नवीन पोस्ट ऑफिस सुरू करावे अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group