पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलखमधील विवेक सोनवणे त्यांनी पत्नी व दोन मुलांसह कार ने पिंपरी-चिंचवड ते लंडन या प्रवासास बुधवार (दि.३०) सुरुवात केली. या मोहिमेस खासदार श्रीरंग बारणे यांनी झेंडा दाखवून या धाडसी प्रवासास शुभेच्छा दिल्या.
शहराचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर चाफेकर पुतळ्याला अभिवादन करून १२० दिवसांच्या व ३१ देशांमधून होणाऱ्या या प्रवासास प्रारंभ करण्यात आला. वसुधैव कुटूंबम व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या हा संदेश ते जगभरातील नागरिकांना देणार आहेत. अशा प्रकारचा प्रवास करणारे ते पहिले महाराष्ट्रातील कुटुंब असणार आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, आरती चौंधे, मोरेश्वर शेडगे उपस्थित होते.
या धाडसी प्रवासी मोहिमेचे कौतुक करत खासदार श्रीरंग बारणे यांनी हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याशी सोनवणे कुटुंबाची भेट घडवून देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यावेळी काटे, चोंधे तसेच अतिरिक्त आयुक्त जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर गणेश कस्पटे यांनी आभार मानले.
Tags: Aarti ChondhePimple NilakhPimpri Chinchwad To LandonPimpri Chinchwad To Landon By CarShatrughan KateShrirang BarneVivek Sonavane