पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

पोलीसांसाठी काम करणारी संस्था पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महिला पदाधिकारी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, उपाध्यक्ष कमलजित सिंह, जसमित सिंह, संग्राम लाड, स्वरूपाताई खापेकर, शीतल ताई आल्हाट, उषाताई आल्हाट, उदय वाडेकर, आशिष सातकर, विनायक जगताप, हितेश प्रजापती, दिनेश काकुलते, प्रशांत भालेराव, केशव त्रिभुवन, रमेश औसरमल, जयंत नित्सुरे, रणजित वडणे, पारसकुमार लुनिया, यांच्यासह पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गजाननभाऊ चिंचवडे म्हणाले, की नेहमीच सण वार सोडून पोलीस बांधव सुरक्षेसाठी दिवस-रात्र तैनात असतात. आज रक्षाबंधनाचा दिवस असताना देखील आपल्या परिवारापासून दूर राहून पोलीस बांधव आपले कर्तव्य निभावत आहेत. देशासाठी केलेले उत्कृष्ट समर्पण व देशसेवा, तसेच समाजसेवेची दखल घेऊन पोलीस बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंह व जसमित सिंह यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group