पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंगीकृत महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना अंगीकृत संघटना आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हेमंत संभूस – महाराष्ट्र नवनिर्माण जणाधिकारी सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने, व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या उपस्थितीत आज दहा जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. आज नियुक्तीपत्र देताना हेमंतजी संभूस, महिला सेनेच्या शहराध्यक्ष सीमाताई बेलापूरकर, सचिव रूपेश पटेकर, उपशहराध्यक्ष राजू सावळे, उपविभाग अध्यक्ष अप्पा अलेक्स हे उपस्थित होते. या सर्व नियुक्त्या एक वर्षाच्या कालावधीसाठी असतील.
पक्षातील सर्व ध्येयधोरण समोर ठेवून पक्ष वाढीसाठी शहरातील नागरिकांच्या ध्येय धोरणासाठी व शहरातील नागरिकांच्या अडीअडचणीसाठी यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण जनधिकार सेना काम करेल असा विश्वास सचिन चिखले यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण जनधिकार सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालील प्रमाणे..
▪️ अमोल जोशी – शहराध्यक्ष
▪️ प्रदीप माने – शहर संघटक
▪️ आकाश भोसले – उपशहराध्यक्ष
▪️ मंगेश ठाकूर – उपशहराध्यक्ष
▪️ चेतन चौगुले – उपशहराध्यक्ष
▪️ पंकज टाक – विभाग अध्यक्ष
▪️ कल्पेश परमार – विभाग अध्यक्ष
▪️ यासीन पठाण – विभाग अध्यक्ष