पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज सांगवी विभाग यांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले.
सांगवी येथे आज (दि.०१) सुरू झालेल्या उपोषणास स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, शिवाजी पाडूळे, बब्रूवान वाघ महाराज, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रवींद्र निंबाळकर, पंकज कांबळे, सुषमा तनपुरे, उज्वला ढोरे, दिलीप तनपुरे, कुमार ढोरे, प्रकाश ढोरे, बाबासाहेब ढमाले, प्रणव ढमाले, विकास लोले, सुरेश ढमाले, अरुण पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या टप्यात सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिल्यानंतर सरकारने आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्रात पाठिंबा म्हणून मराठा बांधवांनी उपोषण करायला सुरुवात केली आहे.
सांगवी मधील सकल मराठा बांधवांकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपोषणाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच या उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी “एकच मिशन, मराठा आरक्षण”, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे आशा प्रकारे घोषणाबाजी करण्यात येत आहे.