पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ एका ३५ वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.३१ ऑक्टोबर) पिंपरी रेखी मीटर 177 /33 जवळ झाला.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्यातरी धावत्या गाडीची जोरदार धडक बसल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. अद्यापही मयताची ओळख पटली नसून, त्याची उंची 5.5 फूट, रंग सावळा, अंगामध्ये ब्लॅक रंगाचे टी-शर्ट त्यावर Black असे पांढऱ्या रंगाने लिहिले आहे.
निळ्या रंगाची पॅन्ट, चॉकलेटी रंगाचे अतंरवस्त्र असे मताचे वर्णन आहे. ओळख पटल्यास पिंपरी रेल्वे पोलीस नाईक पाटील यांच्याशी 8888895266 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.