पिंपरी (Pclive7.com):- सुमधुर आवाजातील स्वरांच्या चांदण्यांची पखरण करणारी गाणी, भाव, भक्ती तसेच नारीशक्तीचा महिमा वर्णन करणाऱ्या रचना, विविध कलावंतांच्या आवाजातील नकला आणि जोडीला टाळ्यांच्या प्रतिसादात पिंपळे सौदागर परिसरातील पीसीएमसीच्या मैदानावर कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव उत्तरोत्तर रंगत गेला. बुधवार (दि.०१) रोजी सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर ब्राम्हण सभेच्यावतीने या मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ब्राम्हण सभेचे अध्यक्ष विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अनिल कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, भारती न्यायाधीश, शशांक खांडेकर, श्रीकृष्ण निलेगावकर, सुरेश तारे, सुरेखा कुलकर्णी, वैदेही कवीश्वर, स्नेहा चिंचवडकर, विजया तारे, अनुराधा निलेगावकर, वासंती जोशी, श्रध्दा खांडेकर यांनी आपली कला सादर करुन उपस्थितांची भरभरून दाद मिळवली. दोन तास चाललेल्या या रंगारंग कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भट यांनी केले. अनिल कुलकर्णी यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कोजागिरी उत्सवाचे औचित्य साधून उपस्थितांनी सदाबहार गाण्यांसोबत मसाला दूध आणि अल्पोपहाराचाही आस्वाद घेतला.






















Join Our Whatsapp Group