पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्चाच्या वतीने ख्रिसमसच्या निमित्ताने सांता क्लॉजच्या वेशभूषेत रोड शो आयोजित करण्यात आला. फादर सिंटो चालीसेरी, आणि समन्वयक ॲड.केएम रॉय यांच्या पुढाकाराने सांता क्लॉजच्या वेशभूषेत फेरीत चर्चच्या सदस्यांकडून नागरीकांना चॉकलेट व केकचे वाटप करण्यात आले.
या फेरीची सुरुवात आकुर्डी चर्च पासून करण्यात आली. मुंबई-पुणे महामार्ग, काळभोर नगर, चिंचवड स्टेशन, चाफेकर चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, भेळ चौक, निगडी बस स्थानक, भक्ती शक्ती, साने चौक, थर्मॅक्स चौक एश्वर्यम सोसायटी शुभश्री सोसायटी या मार्गे चर्च मध्ये फेरी सांगता झाली.