पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रस्ता काँक्रीटीकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात कुणाल आयकॉन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजगी व्यक्त काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागर हे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. परंतु या प्रभागातील प्रमुख रहदारीचा रस्ता असलेला कुणाल आयकॉन रोड हा स्मार्ट सिटी अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस सदर रस्त्याची होत चाललेली दुरवस्था ही चिंतेची बाब असून येथे नागरिकांच्या अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. यावर प्रशासनामार्फत नेहमी तात्पुरते उपाय म्हणून डागडुजी करण्यात येते. परंतु ते देखील काही काळानंतर पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती होते.
कुणाल आयकॉन रस्ता काँक्रीटीकरण करण्याकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सदर रस्ता विकसित करण्यासाठी केली जाणारी निविदा प्रक्रिया पूर्णपणे रखडलेल्या स्वरूपात असून याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद महापालिके मार्फत मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.
तरी या प्रभागातील कुणाल आयकॉन रस्ता लवकरात लवकर विकसित करण्याचा दृष्टीने सकारात्मक विचार करत निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू करावे ही अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
Tags: कुणाल आयकॉन रस्तापिंपळे सौदागरमहापालिका आयुक्तमाजी नगरसेवक शत्रुघ्न काटेशत्रुघ्न काटेशेखर सिंह
























Join Our Whatsapp Group